top of page

अस्तित्व नागरिक हक्कांच...

  • Writer: TrendyBites
    TrendyBites
  • Jul 24
  • 1 min read
खरंच आपलं नागरिकत्व ऑप्शनला पडलंय का?
खरंच आपलं नागरिकत्व ऑप्शनला पडलंय का?

शाळेतला तो साधारण २०–२५ मार्कांचा विषय...


इतिहासाच्या वहीत त्रिकोणी घडीत उरलेल्या पानांमध्ये कुठेतरी दडून बसलेलं होतं लोकशाही, लोकशासन आणि लोकशक्तीचं ज्ञान.


भूगोल आणि इतिहासात जास्त गुण मिळवण्याच्या नादात पर्यायाला टाकलेला तो विषय... ज्यात होतं संविधान, न्यायव्यवस्था आणि कायद्याचं अधिराज्य.


गणित आणि विज्ञानाच्या बलाढ्य ओझ्याखाली दप्तरात चिरडून गेलेल्या त्या पुस्तकात लिहिलं होतं निष्पक्ष मतदान, निवडणुका आणि सजग नागरिकाची जबाबदारी.


ब्रिटिशांची गुलामी, फ्रेंच राज्यक्रांती, पहिले-दुसरे महायुद्ध, टुंड्रा आणि अटलांटिकच्या प्रश्नांच्या गर्दीत हरवून गेले होते शिक्षण संस्था, स्थानिक स्वराज्य आणि लोकसहभागाचे धडे.


शाळा संपली...

मोठे झालोत...

परीक्षा संपल्या...


पण आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत आज जाणवतंय त्या दुर्लक्षित विषयाचं खरं महत्त्व.


नागरिकशास्त्र...


ज्यात शिकवलं होतं मूलभूत हक्क, कर्तव्यं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उत्तम शिक्षण आणि नागरिक म्हणून जगण्याचं अधिकार.


कदाचित तो विषय होता  फक्त २०–२५ मार्कांचा...पण आयुष्य जगण्यासाठी तो शंभर पैकी शंभर गुणांचा होता हे आज समजतय !!



1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Suraj
Jul 24
Rated 5 out of 5 stars.

Great sir!!

It is very applicable for current chaos

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page