शिक्षण आणि लोप पावणारी मातृभाषा
- TrendyBites
- Jan 5
- 1 min read
"हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली
युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पाऊली"
ही शाळेतल्या समूहगीतातली ती ओळ डोक्यात हळुवार ठणकली आणि आजची शिक्षणाची चाललेली गळचेपी अस्वस्थ करून राहिली.
युगायुगांची ज्ञानगंगा जिने मराठी भाषेतून ह्या महाराष्ट्रात नव्हे तर जगात आजतोवर अनेक बलाढ्य व्यक्तिमत्त्व घडवायचं सर्वोच्च काम केलय ती कुठेतरी लोप पावतेय का? ह्याच भीतीनं माझं मन बेचैन करून टाकतंय.

आपल्या माय-मराठीला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालाच पण ही भाषा शिकवणाऱ्या मराठी माध्यम शाळाच बिल्डर लॉबीने घश्यात घातल्यात. मातृभाषा जगवायला पुढच्या पिढीच हव असणारं योगदानच नसेल तर मराठी काय कुठलीच मातृभाषा तीच अस्तित्व वाचवू शकणार नाही.
मुलांच्या Day care, Nursery वयापासूनच So called international schools साठी वाढत चाललेला पालकांचा अट्टाहास आणि स्पर्धेच्या जगात त्या मुलाला भरडवून टाकण्याची चाललेली स्टँडर्ड मॅरेथॉन ह्यात कुठेतरी मातृभाषेची ओळख आपण हरवतोय का?
आज आपला इतिहास साक्ष आहे की १५० वर्षे ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनाही आपल्या भाषा आणि संस्कृती हिसकावून घेता आली नाही कारण आपल्या पूर्वजांनी ते होऊ दिले नाही.आज आपण ती नैतिक जबाबदारी आहोत जिथे आपल्या पुढच्या पिढ्या ह्या आपण रुजवु तसं उगवतील.
नवनवीन भाषा शिकणं हे एक उत्तम कौशल्य आहे आणि प्रत्येक मूल हे त्याच्या पद्धतीने आत्मसात करतो. पण Basic Education मातृभाषेतून दिले गेले तर मुलांचा होणारा बौद्धिक आणि मानसिक विकास हा खूप प्रगल्भ असेल, अस मत स्वतः UNESCO ने हायलाइट केलंय.
असो....हा एक छोटासा प्रयत्न जिथे मला विश्वास आहे की आपण आपली बोली , आपली भाषा आपल्या पुढच्या पिढ्यापिढ्यांतून जगवू!!




खरंच... आपणच आपली मातृभाषा जपली पाहिजे...
Good initiative.. great work
11th hour need sir