IIराजाधिराज शिवछत्रपती II
- TrendyBites
- Feb 23
- 1 min read

जिजाऊंच तेजस्वी बाळ तू
स्वराज्याचा तळपता काळ तू
क्षत्रिय कुळ वंश तू
म्लेंच्छपर दंश तू
पराक्रमाचं ज्ञान तू
गनिमीतलं विज्ञान तू
बुद्धिमत्तेचं वाण तू
नीतीमत्तेची जाण तू
गीतेचा संकल्प तू
योध्याचा अभिकल्प तू
नवक्रांतीचा सूर तू
स्वसंस्कृतीचा नूर तू
धाडसाचं सत्व तू
स्वाभिमानाच तत्व तू
हिंदवी भूमीतला श्रीमान तू
मायमराठीचा मान तू
-दुर्गेश




khup mast lihilay sir!!
जय शिवराय
अप्रतिम....keep it up दुर्गेश