top of page

सह्याद्री जगलाच पाहिजे!!

Writer: TrendyBites
TrendyBites
Sep 25
1 min read

सूर्य उगवला,प्रकाश पडला,आडवा डोंगर

आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार!!

संत एकनाथांची ती भारुड कानी पडली. अन प्रश्न पडला जर हा डोंगरच सरसकट कापायला घेतलात, तर तो सूर्य कुठे लपणार नि नमस्कार कोणाला राहणार?


पश्चिम घाटातील सह्याद्री जगातील महत्त्वाच्या जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक असून, तो मान्सूनच्या चक्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो.येथे जागतिक स्तरावर किमान ३२५ दुर्मिळ प्रजाती आढळतात. कित्येक जनसमुदाय आजही आपल्या संस्कृतीसह येथे आनंदाने आपली दिनचर्या करत आहेत.


जुलै २०२६ मध्ये केंद्राने पश्चिम घाटातील सुमारे ५६,८२६ चौ.कि.मी. क्षेत्राला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली. मात्र त्यातील सुमारे ३८८ गावांना विकास करण्याच्या नावाखाली वगळण्याची मागणी प्रामुख्याने महाराष्ट्र सरकार करत आहे जे सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील जीवसृष्टीचा प्रदेश आहे. मूळ जीवसृष्टी,जनप्रजाती,निसर्ग चिरडून विकास नक्की महाराष्ट्राचा चाललाय की अजून कोणाचा? प्रश्न गंभीर आहे.


सह्याद्री ह्या केवळ डोंगररांगा नाहीत तर  महाराष्ट्राचा मोकळा श्वास आहे आणि तोच आता दाबून टाकणार का?आज केवळ डोंगरांच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिलेला नाही; तर तो जंगल, पाणी, जैवविविधता आणि मानवी भवितव्याचा प्रश्न बनला आहे. रस्ते, पर्यटनाचा वाढता दबाव, खाणकाम, शहरीकरण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे पश्चिम घाटातील अधिवासाचे तुकडीकरण सर्रास होत आहे.. हे थांबल पाहिजे कुठेतरी.


आज आपला डोंगर हरवतोय....आज आपली ओळख हरवतोय!!

पण डोंगर हरवला तर विकास टिकणार कसा?

जंगल कापले तर पाऊस थमनार कुठे?

झरे आटले तर नद्या वाहतील कुठून ?

आणि सह्याद्रीच हरवला…तर

तर महाराष्ट्राची ओळख ती काय उरेल?


विकास तेवढाच हवा—ज्याचा समतोल असेल. आणि तो सह्याद्रीच्या किंमतीवर नाही.


सह्याद्री जगलाच पाहिजे!

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
nidhi
Sep 25
Rated 5 out of 5 stars.

Must stop all these and let nature to breathe.

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page