top of page

वारी अंतरंगाची

  • Writer: TrendyBites
    TrendyBites
  • Jul 26
  • 1 min read

लहान होतो, आजोबा विठू माऊलीच्या भक्तीत तल्लिन व्हायचे.प्रश्न पडायचा की एक वीट, कर कटावर  ऐटीत विठू आपल्या भक्तांच्या लाटेसमोर शेकडो वर्षांपासून असा अखंड उभा का असावा?


कदाचित प्रश्न विठ्ठलाचा नव्हता,तर त्या लाटेचा होता जी सातशे वर्षांपासून भक्तीची ओढ, आत्मचिंतन आणि आयुष्यातलं संसाराचं गणित यात गुरफटलेल्या प्रवासाला "तू एकट नाहीस" हे क्षणभर का होईना सांगण्याचा प्रवाह असावा.


वारीत पांडुरंगाने त्या प्रवाहाला काय दिलं असेल तर ते स्वतःपासून लपवून ठेवलेलं स्वतःच मुक्त मन.


म्हणूनच वारी भगवंतापर्यंत जाणारी वाट नसावी, ती स्वतःला स्वतःपर्यंत पोहचवणारी लाट असावी.


वारीत स्वतःला  मी किती श्रीमंत, किती बरोबर,किती यशस्वी सिद्ध न करता तेथूनच  स्वतः समजून घेण्याची चाहूल होती.


वारीत 'मी' शुल्लक होत गेला नि आपलेपण मोठे होत गेलं.अहंकार बाजूला पडला नि एक जात एक धर्म वारकरी माऊली बनला.


अठ्ठावीस युगे उलटली,साम्राज्य गेली,राजे गेले,जग बदललं पण आषाढीला वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावर त्या विठू माऊलीच्या गजरात आजही तल्लीन आहे.


वारी हे युगानुयुगे अखंड वाहणाऱ्या विश्वासाचे प्रतीक आहे.ते माणसाला माणूस म्हणून जगवायचं एक शास्त्र आहे.


!! जय जय विठ्ठल!!

!!जय हरी विठ्ठल!!




2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
nisha
Aug 11
Rated 5 out of 5 stars.

great content..

Like

TrendyBites
TrendyBites
Jul 26
Rated 5 out of 5 stars.

Nice blog

Like

©2024 by TrendyBites.

bottom of page